सदा-सर्वदा गोड-धोड खाणारा आपल्या आजूबाजूलाच राहणार पण तरीही चार हात
लांब असणारा देव. पण ह्या पुण्यातले देव मात्र जरा वेगळे आहेत. तो आपल्यातला
आहे, आपला आहे आणि आपल्या सारखाच आहे. त्यामुळे त्याची नावं देखील आपली
वाटतील अशीच…
सदा-सर्वदा गोड-धोड खाणारा आपल्या आजूबाजूलाच राहणार पण तरीही चार हात
लांब असणारा देव. पण ह्या पुण्यातले देव मात्र जरा वेगळे आहेत. तो आपल्यातला
आहे, आपला आहे आणि आपल्या सारखाच आहे. त्यामुळे त्याची नावं देखील आपली
वाटतील अशीच…
सदा-सर्वदा गोड-धोड खाणारा आपल्या आजूबाजूलाच राहणार पण तरीही चार हात
लांब असणारा देव. पण ह्या पुण्यातले देव मात्र जरा वेगळे आहेत. तो आपल्यातला
आहे, आपला आहे आणि आपल्या सारखाच आहे. त्यामुळे त्याची नावं देखील आपली
वाटतील अशीच…
सदा-सर्वदा गोड-धोड खाणारा आपल्या आजूबाजूलाच राहणार पण तरीही चार हात
लांब असणारा देव. पण ह्या पुण्यातले देव मात्र जरा वेगळे आहेत. तो आपल्यातला
आहे, आपला आहे आणि आपल्या सारखाच आहे. त्यामुळे त्याची नावं देखील आपली
वाटतील अशीच…
भिकारदास मारुती
धष्ट-पुष्ट शरीरयष्टी, आडदांड असा देह, हातात गदा असणारा, नेहमी तेलाने अंघोळ करणारा आणि तुपाशी खाणारा मारुतीराया भिकारदास कसा झाला?
खुन्या मुरलीधर
साधा भोळा प्रेमळ देव आणि नाव मात्र खुन्या मुरलीधर. काहीही काय बोलताय? आमच्या निरागस कृष्णाला कशाला बरं वेठीस धरताय? अहो थांबा! बरोबरच आहे तुमचं. देवाची ह्यात काहीही चूक नाही. पण संपूर्ण जगाची दुःख स्वतःच्या पाठीवर घेणारा हा भगवंत ना! मग ह्यानेही असंच काहीसं केलं.
दाढीवाला दत्त
सध्या दाढीची ‘फॅशन’ सगळीकडेच चर्चेत आहे. या यादीत सिनेमा नट, खेळाडू आहेतच पण आमचे मुख्यमंत्री देखील मागे राहिले नाहीत. ह्या यादीत सर्वात पहिले स्थान आहे ते मात्र दत्तप्रभूंचेच. काय विश्वास नाही बसत?
उंटाड्या मारुती
विष्णूचं वाहन गरुड, गणपतीचं वाहन उंदीर पण मग मारुतीचं वाहन कोण? अहो मारुती तर स्वतःच उड्डाण करून कुठेही जाऊ शकतो. मग त्याला वाहनाची गरज काय? पण मग पुण्यातल्या मारुतीला उंटाड्या मारुती कसं काय म्हणतात?
डुल्या मारुती
हनुमंत गदा चालवतो हे ऐकलं होतं, पण मारुती डुलतो देखील? हो आमच्या पुण्यातल्या मध्यवस्तीत भेटेल तुम्हाला हा आमचा डुल्या मारुती. पण मग हा मारुती डुलायला लागला तरी कसा?
प्रेमळ विठोबा
देव म्हणजे भक्तांच्या हाकेला धावणारा, त्यांच्या नेहमी पाठीशी उभा राहणारा, भक्ताची सर्व दुःख दूर करणारा. असाच भक्तासाठी त्रिकाळ विटेवर उभा राहणारा आपला विठोबा. पण मग ह्या विठोबाला ‘प्रेमळ’ असे खास विशेषण लावण्याची काय गरज पडली असेल?
गुंडाचा गणपती
देवाला माणसाचा जात, धर्म, वंश, व्यवसाय ह्याने काहीच फरक पडत नाही. देवासाठी प्रत्येक माणूस हा सारखाच! असाच आमचा गुंडाचा गणपती. पण मग गुंडच का?
मोदी गणपती
एखाद्या रस्त्याला, ठिकाणाला माणसांची नावे द्यायची पद्धत पूर्वीपासून चालू आहे. पण देवाला चक्क माणसाचं नाव? हे जराच अतीच झालं नाही का? अहो, पुणे आहे हे! विसरलात?
उंबऱ्या गणपती
देवाचं स्थान कुठे तर देवघरात, नाहीतर मंदिरातल्या गाभाऱ्यात. पण त्याच देवाला उंबऱ्या गणपती का बरं म्हणू म्हणायचं?
पत्र्या मारुती
पत्र्या मारुती म्हणजे दगडाऐवजी पत्र्याचा मारुती? कसं बरं शक्य आहे? पण मग ‘पत्र्या मारुती हे नाव कसं बरं पडलं असेल?
बटाट्या मारुती
रताळ्या, भोपळ्या, बटाट्या ह्या भाज्या अपशब्द कधी आणि का झाल्या ह्याचे उत्तर आम्हालाही ठाऊक नाही. माणसांपर्यंत ठीक आहे. पण हे पुणेकर चक्क मारूतीलाच बटाट्या म्हणून ओळखायला लागले तर कसं व्हायचं?
बंदिवान मारुती
‘चोर सोडून संन्याश्याला फाशी’ ही म्हण तर आपल्याकडे पूर्वीपासूनच प्रचलित आहे पण मग असं काय झालं की लोकांनी मारूतीलाच ‘बंदिवान’ करून टाकले?
सोन्या मारुती
आमच्या गल्लीतल्या प्रत्येक मुलाला प्रेमाने सोन्या म्हणणारे आम्ही पुणेकर चक्क देवालाही सोन्या म्हणतो. पण नक्की कसा काय झाला सोन्या मारुती?
पासोड्या विठोबा
आता राज्य आलं ते पासोड्या विठोबावर. पासोड्या ह्या शब्दाचा अर्थ देखील आपल्यापैकी कित्येकांना माहित नसतो. पासोड्या म्हणजे गोधड्या. पण मग विठोबाने कशी काय नावातच गोधडी पांघरली? हे जाणून घेण्यासाठी शेजारी दिलेला व्हिडीओ नक्की बघा.
उपाशी विठोबा
देव म्हटलं की त्याची साग्रसंगीत पूजा आली आणि त्यामागून पंचपक्वान्नांचा नैवेद्यही आलाच. आता पंचपक्वान्न नाही तरी भक्ताच्या प्रेमापोटी देवाला पिठलं-भाकरी देखील गोडच लागते. पण आपल्या सदाशिव पेठेतील विठोबा मात्र कित्येक वर्ष उपाशी बसलाय. का?
जिलब्या मारुती
आमच्या गल्लीतल्या प्रत्येक मुलाला प्रेमाने सोन्या म्हणणारे आम्ही पुणेकर चक्क देवालाही सोन्या म्हणतो. पण नक्की कसा काय झाला सोन्या मारुती?
सोट्या म्हसोबा
म्हसोबा म्हणजे पुण्याच्या वेशीचा रक्षक. आता रक्षणार्थ हातात सोटा घेतला तर ठीक आहे. पण ह्या म्हसोबाच्या तर नावात सोटा. आता हा ‘सोटा’ नक्की कुठून आला?
दुध्या मारुती
मारुतीच्या देवळात गेलं की सहसा तेल अपर्ण करताना आपण पाहतो. त्यामुळे मारुतीला ‘तेल्या मारुती’ असं म्हटलं तर ठीक आहे. पण शुक्रवार पेठेतल्या मारुतीला चक्क ‘दुध्या मारुती’ म्हणतात. आता ते का आणि कशाला?
निवडुंगा विठोबा
मारुतीच्या देवळात गेलं की सहसा तेल अपर्ण करताना आपण पाहतो. त्यामुळे मारुतीला ‘तेल्या मारुती’ असं म्हटलं तर ठीक आहे. पण शुक्रवार पेठेतल्या मारुतीला चक्क ‘दुध्या मारुती’ म्हणतात. आता ते का आणि कशाला?
बिजवर विष्णू
नवदाम्पत्त्याला आशीर्वाद देताना आपण म्हणतो की ‘अगदी लक्ष्मी-नारायणाचा’ जोडा दिसतोय. आता लक्ष्मी-नारायण म्हणजे काय तर एक ‘आदर्श जोडपं’. पण ह्या विष्णूला जर त्याच्या अर्धांगिनीपासून दूर केलं तर? असंच काहीस झालं आणि नारायणाचा ‘बिजवर विष्णू’ झाला. ह्या मागची नक्की गोष्ट काय?
धक्या मारुती
धक्के आपल्यासाठी काही नवीन नाहीत. गर्दीत चालताना खाल्लेले धक्के असूदेत किंवा मग आई-वडिलांनी दिलेले धक्के. धक्के हे आपल्या आयुष्यच अविभाज्य भाग आहेत. पुण्यातल्या एका मारुतीने मारत चक्क आपल्या नावानेच सगळ्यांना धक्का दिलाय. आता हा नक्की कोणता धक्का?
लखेरी मारुती
माणसाच्या संगतीप्रमाणे त्याची ओळख केली जाते. तसेच काहीसं रास्त पेठेतल्या मारुतीचं देखील झालं आणि लखेरी मारुती झाला. ते कसं?
पावट्या मारुती
अर्थाचा अनर्थ करण्याची सवय ही पुणेकरांमध्ये पूर्वापार पासून रुजत आली आहे. आता त्यात ह्यांची चूक तरी काय? देवांनी अशी नाव धारण केली तर माणसांची गल्लत होणारच! पावट्या मारुती असं नाव असल्यावर माणसं भाजीची संबंध जोडणारच. पण मग हा पावटा आला तरी कुठून?
शकुनी मारुती
देव नेहमीच भक्ताच्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो. मग तो कोणताही देव असूदेत. कोणता ना कोणता देव प्रेत्त्येकाच्या आयुष्यात ‘नायक’ बनून येतो येतोच. पण मग असं काय झालं आणि मारुतीला महाभारतातल्या खलनायकाचं नाव मिळालं?
भांग्या मारुती
देव भक्तासाठी कोणत्याही थराला जाईल. पण बिचारा एकदा का गाभाऱ्यात जाऊन बसला की त्याला काही बाहेर पडता येत नाही. शनिवार पेठेतल्या भांग्या मारुतीचं असंच काहीसं झालं असेल का?
वज्रदेही गणपती
देवासाठी सर्व भक्त समान असतात. तसेच भक्तासाठीदेखील सर्व देव सारखे असू शकतात की. गणपतीची मूर्ती घडवताना मूर्तिकाराच्या मनात असंच काहीसा विचार आला असेल आणि त्यातूनच पैलवानी शरीरयष्टी असणाऱ्या गणपती बाप्पाने आकार घेतला असेल का?
जाळीचा मारुती
देव नेहमी एकांतात बसलेला असतो. माणसांपासून चार हात लांबच. अनुस भेटायला गेला तरी देवाचं दर्शन देखील जाळीच्या आडूनच. त्यात नवीन काही नाही. पण मग शुक्रवार पेठेतल्या मारुतीला ‘जाळीचा मारुती’ असं कशाला म्हणतात
चिमण्या गणपती
तसं बघायला गेलं तर गणपती बाप्पा आणि चिमणी ह्या पक्षाचा काहीच संबंध नाही. कधी गोष्टींमध्ये सुद्धा गणपती आणि चिमणी समोर आलेले आठवत नाहीत. पण तरी देखील सदाशिव पेठेतल्या चिमण्या मात्र गणपतीवर अवलंबून होत्या.
विसावा मारुती
देवापाशी गेलं की कसं शांत वाटतं. मनाला देखील आराम मिळतो. तसाच आराम कधीतरी देवालाही हवा असतो. म्हणूनच कदाचित पुण्यात तुम्हाला ‘विसावा मारुती’ भेटेल.