दिनदर्शिका २०२४-२५
₹ 200.00
मंडळी…
२०२४-२५ ची दिनदर्शिका (Table Calendar)…
*समृद्धखुणा*
संस्कृती आणि भाषा एकमेकींच्या हातात हात घालून चालतात. संस्कृतीचा हात सुटला, तर भाषेचा प्रवास खुंटतो. एकीला वाचवायचं तर दुसरीलाही धरून राहणं तितकंच महत्त्वाचं वाटतं. आधुनिकतेच्या वेगात मागे पडणाऱ्या वस्तू, जसे की भिंतीवरची खुंटी, कुंकवाचा करंडा, कोनाड्यातली चिमणी किंवा पाटा वरवंटा अशा गोष्टी नव्या पिढीला समजतील अशा भाषेत ह्या ‘समृद्धखुणा’ दिनदर्शिकेमार्फत जपण्याचा हा छोटासा प्रयत्न. आपल्यातल्या प्रत्येकाकडे असावी आणि भेटस्वरुपात मित्रमंडळी, नातेवाईक सर्वांपर्यंत पोहोचवावी अशी ही दिनदर्शिका.