“मराठी आमची मातृभाषा आहे” असं म्हणणं वेगळं, आणि त्यासाठी काही करणं वेगळं.
दोन मराठी माणसे समोर आली तरी इंग्रजीत बोलतात — हे पाहून मनात एक प्रश्न उभा राहिला. आपण मराठीत बोलण्यासाठी का लाजतो?
खलबत्त्यात मसाले कुटून त्यातून जसा सुगंध बाहेर पडतो, तसाच मराठी भाषेचा सुगंध रोजच्या जगण्यात यावा — हा विचार खलबत्ताच्या जन्माचा आधार आहे.
मराठी शुद्ध, सहज, अभिमानाने बोलली जावी. प्रमाण मराठी असो वा बोलीभाषा — आम्ही फक्त मराठीच्या बाजूने आहोत.
“जेव्हा डबा खोल आणि बटणं बंद कर” अश्या पंक्ती कानावर पडायला लागल्या — खलबत्ता व्यासपीठ त्याच जाणिवेतून जन्मलं.
“मराठी वळवावी तशी वळते — पण ती आधी आपणच वळवायला हवी.”