आमच्याबद्दल
खलबत्ता — मराठीचा सुगंध जपणारं व्यासपीठ

“मराठी आमची मातृभाषा आहे” असं म्हणणं वेगळं, आणि त्यासाठी काही करणं वेगळं.

३+
वर्षे मराठी सेवेत
१२
देव बिव मालिकेतील कथा
मराठी अभिमानाचे क्षण
खलबत्ता
आमची कहाणी
खलबत्ता कसं सुरू झालं?

दोन मराठी माणसे समोर आली तरी इंग्रजीत बोलतात — हे पाहून मनात एक प्रश्न उभा राहिला. आपण मराठीत बोलण्यासाठी का लाजतो?

खलबत्त्यात मसाले कुटून त्यातून जसा सुगंध बाहेर पडतो, तसाच मराठी भाषेचा सुगंध रोजच्या जगण्यात यावा — हा विचार खलबत्ताच्या जन्माचा आधार आहे.

मराठी शुद्ध, सहज, अभिमानाने बोलली जावी. प्रमाण मराठी असो वा बोलीभाषा — आम्ही फक्त मराठीच्या बाजूने आहोत.

“जेव्हा डबा खोल आणि बटणं बंद कर” अश्या पंक्ती कानावर पडायला लागल्या — खलबत्ता व्यासपीठ त्याच जाणिवेतून जन्मलं.

— खलबत्ता व्यासपीठ

“मराठी वळवावी तशी वळते — पण ती आधी आपणच वळवायला हवी.”

मराठी प्रथम
जिथे मराठीचा वापर होऊ शकतो तिथे मराठीलाच प्राधान्य.
शुद्धता आणि सहजता
चुका टाळत, सहज अभिमानाने मराठी बोलणे.
पुढच्या पिढीसाठी
मराठीची गोडी लहान मुलांपर्यंत पोचवणे हे ध्येय.
बोलीभाषेचा आदर
विदर्भ असो, कोकण असो — प्रत्येक मराठी बोली आमची.
आमच्यासोबत या
मराठीचा अभिमान बाळगा,
खलबत्ता सोबत असा
Instagram वर follow करा, मराठी भाषाविषयक उपक्रमांचा भाग व्हा.